आ. भा. मगदूम जन्मशताब्दी वर्षाचे शानदार उदघाटन
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील प्रख्यात लेखक, कवी, प्रकाशक आ. भा. मगदूम उर्फ कवी वीरानुयायी यांच्या जन्म शताब्दीवर्षाचे उदघाटन आज सांगलीजवलील समडोळी या त्यांच्या जन्मगावी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस दक्षिण भारत जैन सभेचे विश्वस्त श्री धनपाल हेरवाडे, महामंत्री श्री पोपटलाल डोर्ले, बा. भू. पाटील ग्रन्थमालेचे चेअरमन प्राध्यापक रवीन्द्र बलोळ, श्री रविन्द्र मगदूम यांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर श्री. धनपाल हेरवाडे यांनी आ. भा. मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घातला.
आ. भा. मगदूम यांचे एक विद्यार्थी श्री ने. सा. पाटील. गुरूजी यांनी आ. भा. मगदूम यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आणि जन्म शताब्दीवर्षाचे उदघाटन जाहिर करण्यात आले. या प्रसंगी समडोळी, सांगली व परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
आ. भा. मगदूम उर्फ कवी वीरानुयायी यांच्या जन्म शताब्दी वर्षात चर्चासत्रे, व्याख्याने, कथालेखन कार्यशाला, स्मरणिका प्रकाशन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आ. भां. च्या निवडक पुस्तकांचे पुन:प्रकाशनही करण्यात येणार आहे. यासाठी कवी वीरानुयायी उर्फ आ. भा. मगदूम जन्मशताब्दी समारोह समितीची स्थापना करण्यात आली आहे.
आ. भा. मगदूम यांचा जीवन परिचय, त्यांचे साहित्य, छायाचित्रे इत्यादी माहिती www.veeranuyayi.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
-महावीर सांगलीकरसमन्वयक, आ. भा. मगदूम जन्मशताब्दी समारोह समिती पुणे
फोटो1: प्रतिमेस पुष्पहार घालताना श्री धनपाल हेरवाडे, दीपप्रज्वलन करताना श्री पोपटलाल डोर्लेफोटो2: दीपप्रज्वलन करताना श्री धनपाल हेरवाडे, श्री पोपटलाल डोर्ले
Thursday, March 27, 2008
प्रसिद्धीसाठी / Press Release आ. भा. मगदूम जन्मशताब्दी वर्षाचे शानदार उदघाटन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment