Thursday, March 27, 2008

प्रसिद्धीसाठी / Press Release आ. भा. मगदूम जन्मशताब्दी वर्षाचे शानदार उदघाटन

आ. भा. मगदूम जन्मशताब्दी वर्षाचे शानदार उदघाटन

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील प्रख्यात लेखक, कवी, प्रकाशक आ. भा. मगदूम उर्फ कवी वीरानुयायी यांच्या जन्म शताब्दीवर्षाचे उदघाटन आज सांगलीजवलील समडोळी या त्यांच्या जन्मगावी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस दक्षिण भारत जैन सभेचे विश्वस्त श्री धनपाल हेरवाडे, महामंत्री श्री पोपटलाल डोर्ले, बा. भू. पाटील ग्रन्थमालेचे चेअरमन प्राध्यापक रवीन्द्र बलोळ, श्री रविन्द्र मगदूम यांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर श्री. धनपाल हेरवाडे यांनी आ. भा. मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घातला.

आ. भा. मगदूम यांचे एक विद्यार्थी श्री ने. सा. पाटील. गुरूजी यांनी आ. भा. मगदूम यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आणि जन्म शताब्दीवर्षाचे उदघाटन जाहिर करण्यात आले. या प्रसंगी समडोळी, सांगली व परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

आ. भा. मगदूम उर्फ कवी वीरानुयायी यांच्या जन्म शताब्दी वर्षात चर्चासत्रे, व्याख्याने, कथालेखन कार्यशाला, स्मरणिका प्रकाशन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आ. भां. च्या निवडक पुस्तकांचे पुन:प्रकाशनही करण्यात येणार आहे. यासाठी कवी वीरानुयायी उर्फ आ. भा. मगदूम जन्मशताब्दी समारोह समितीची स्थापना करण्यात आली आहे.

आ. भा. मगदूम यांचा जीवन परिचय, त्यांचे साहित्य, छायाचित्रे इत्यादी माहिती www.veeranuyayi.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

-महावीर सांगलीकरसमन्वयक, आ. भा. मगदूम जन्मशताब्दी समारोह समिती पुणे

फोटो1: प्रतिमेस पुष्पहार घालताना श्री धनपाल हेरवाडे, दीपप्रज्वलन करताना श्री पोपटलाल डोर्लेफोटो2: दीपप्रज्वलन करताना श्री धनपाल हेरवाडे, श्री पोपटलाल डोर्ले

Wednesday, March 26, 2008

वीरानुयायी आ. भा. मगदूम

वीरानुयायी आ. भा. मगदूम यांचा जन्म २६ मार्च १९०८ रोजी सांगली जवलील समडोळी या खेडेगावात झाला. समडोळीच्या भाऊ बाबाजी मगदूम यांचे ते जेष्ठ सुपुत्र. भाऊ मगदूम हे अत्यंत प्रतिष्ठित आणि संपूर्ण गावात दरारा असणारे सदगृहस्थ होते.

आप्पा भाऊ मगदूम यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत समडोळी येथेच झाले. त्या काली प्राथमिक शिक्षक होण्यासाठी एवढे शिक्षण पुरेसे होते. ते सांगली जिल्ह्यातील भोसे येथील प्राथमिक शालेत उपशिक्षक म्हणून रुजू झाले.

याच कालात आपला पेशा सांभालून ते विविध नियतकालीकांतून विविध विषयांवर लेख, कथा, कविता, प्रवास वर्णने इत्यादी प्रकारचे साहित्य लिहू लागले. त्या कालच्या प्रसिद्ध शालापत्रक, किर्लोस्कर, प्रावीन्य, जैन बोधक, प्रगती आणि जिनविजय या व इतर अनेक नियतकालीकांतून त्यांचे साहित्य प्रकाशित होऊ लागले. दर्जेदार लिखान आणि सोपी व रंजक भाषा, नेमक्या शब्दात विषय मांडण्याची हातोटी, विषयवैविध्य यामुले त्यांना मराठी साहित्य जगतामध्ये अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली.

पुढे त्यांची बदली आष्टा येथे झाली. तिथे असताना त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत शिवाजी कोण ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या नंतर त्यांची बदली समडोळी या त्यांच्या मूळगावी झाली. समडोळी हे कांहीसे आडबाजूला असणारे एक छोटेसे खेडे, पण ते त्या कालात विविध प्रकारच्या चळवलींचे केन्द्रच बनले होते. सांगलीपासून जवळ आणि तरीही आडबाजूला असल्याने स्वातंत्र्य सैनिक या खेडयाचा उपयोग एकत्र येउन विचार विनिमय करण्यासाठी करीत असत. बा. भू. पाटील व ना. ह. आपटे हे प्रसिद्ध मराठी लेखक याच गावचे.

आप्पा भाऊ मगदूम यांनी समडोळीला आल्यावर श्री वीर ग्रंथमाला या प्रकाशन संस्थेची स्थापना केली. या ग्रंथ मालेचा उद्देश जैन साहित्य प्रकाशित करून ते जैन व अजैन समाजापर्यंत पोहचवणे हा होता. या मालेचे पहिले पुष्प म्हणजे १९३७ साली प्रकाशित झालेले वीर शासन हे पुस्तक होय. या पुस्तकात भगवान महावीरांच्या शिकवणूकीचे रसाळ भाषेत वर्णन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे पुस्तक त्या वेळच्या मुंबई इलाखा विद्या खात्याने शिक्षकांच्या वाचनालयांकरीता मंजूर केले होते. पुढे या ग्रंथमालेतून आ. भा. मगदूम यांनी स्वत: लिहिलेली तसेच प्रसिद्ध लेखक तात्या केशव चोपडे, बा. भू. पाटील, रा. ने. शहा यांची एकूण २४ पुस्तके प्रकाशित झाली. त्यात महाराष्ट्रा तील ३० कविंच्या प्रातिनिधिक कवितांचा संग्रह नादलहरी याचा ही समावेश होता.

कुशल प्रकाशक
श्री वीर ग्रंथ मालेच्या बहुतेक पुस्तकांच्या किमान दोन आवृत्त्या निघाल्या, त्या देखील अल्पावधीतच. त्या कालातील इतर पुस्तकांच्या मानाने मालेची पुस्तके थोडीशी महाग असत, तरीही त्यांना भरपूर मागणी असे. याचे कारण म्हणजे आ. भा. मगदूम यांचे कुशल व्यवस्थापन, प्रचार यंत्रणा व विक्री व्यवस्था हे होय. मालेच्या पुस्तकांची परीक्षणे प्रमुख मराठी नियतकालीकांमधून प्रसिद्ध होतच, शिवाय Oriental Literary Digest व Bombay Chronicle या सारखी इंग्रजी नियतकालिकेही त्यांच्या पुस्तकांची दखल घेत.

मालेची अनेक पुस्तके मुम्बई इलाखा व मध्य प्रांत या दोन्ही राज्यांच्या विद्याखात्यांनी शिक्षकांच्या वाचनालयांकरीता मंजूर केली होती.

पुस्तके मोफत वाटायाला आ. भा. मगदूम यांचा विरोध होता. पुस्तके मोफत दिल्यास अनेकांना त्याची अजिबात किंमत वाटत नाही, त्यामुले अल्पशी का होईना, किंमत जरूर आकारावी असे त्यांचे स्पष्ट मत होते.

आ. भा. मगदूम यांनी लिहिलेल्या साहित्यात विविधता आढ़लून येते. त्यात कथा, लेख, कविता, चरित्र, नाटके, अनुवाद, विवेचन, प्रवास वर्णन, कादंबरी यांचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक साहित्यात श्रेणिक, चन्द्रगुप्त, अशोक, कुमारपाल, वनराज चावडा, शिवाजी इत्यादी प्राचीन व मध्ययुगीन वीरांच्या कार्यांचा परिचय आहे.

आ. भा. मगदूम यांनी हिन्दी व इंग्रजीतही लिखाण केले आहे.

१९४२ साली त्यांनी समडोळी येथे काँग्रेस कमिटीची स्थापना केली.

अशा या अष्टपैलू साहित्यिकाचे १९४८ साली वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी निधन झाले. आडबाजूच्या खेड्यात राहून साहित्य निर्मितीचे त्यांचे कार्य खरोखरच वाखानन्यासारखे आहे.

Appa Bhau Magdum was a great Marathi writer of 20th Century. He wrote 19 books in a short span and various articles and stories in different magazines. Many of his books were published multiple times. He became a popular writer because of the easy communicable language in which he always wrote. He was also a publisher, poet and social reformer.

His pen name is Veeranuyayi (Follower of the Brave, i.e. Lord Mahavir), was well known as
Aa. Bha. Magdum in literary world and Appasaheb with the villagers. He was born in a renowned Jain family on 26th March of 1908 at Samdoli, a village near Sangli in Maharashtra. He was the eldest son of Bhau Babaji Magdum and Bahinabai.

Bhau Babaji Magdum was an agriculturist and trader. He was well educated and very knowledgeable person of progressive thoughts. He was a good reader and read thousands of books on various subjects. He had five sons and two daughters, Appasaheb was the eldest son.


Appasaheb learnt up to 7th standard, which was sufficient at that time to become a teacher. He became a teacher and was appointed at a primary school in Bhose, a small village in Sangli district. There he started to write articles and stories in various Marathi magazines. He wrote mainly for Jain Bodhak, Pragati Ani Jinvijay, Shala Patrak, Pravinya, Shantisindhu etc.

After a year, he was transferred to Ashta, another village near Sangli. There he wrote a novel on the great Maratha warrior Chhatrapati Shivaji. No details about this novel are available except the name 'Shivaji Kon?' and the year of publishing 1935. At the same village he wrote and published a small biography of the Jain monk Putturkar Nemisagar Maharaj, who was disciple of Acharya Shantisagarji, the renowned Jain Acharya of 20th century.

In 1936, Appa Bhau Magdum got transferred to Samdoli, his home town. This was a great village with full of religious and social activities. Here he got a great scope for his literary activities. In 1937 he founded a publication house 'Shree Veer Granth Mala'. He planned to publish 4 books per year and send to the subscribers. Accordingly, he wrote and published the first book 'Veer Shasan' of his publication house. This 64 page book was a collection of some essays and two lyrics. The subject of this book was the religion and philosophy of Bhagwan Mahavir. Ravaji Nemchand Shaha, the renowned Jain scholar and writer wrote preface for this book. This book got a warm welcome from Jains and non Jains. It was approved by Mumbai State Education Department for the libraries of teachers.

Enthused by this welcome, he wrote and published many other books. His earlier books were printed in Sangli, and later at Shri Mahavir Press, Belgaum. Most of his books were in 64 pages. He was the first publisher to publish Jain books in series. The reviews of his books were published not only in various Jain magazines, but also in non Jain magazines and English periodicals like 'Oriental Literary Digest' and 'The Bombay Chronicle'. His books were used for the syllabus of religious exams at Ailak Pannalal Gurukul, Solapur and Shri Bahubali Bramhcharyashram, Bahubali.

He opposed free distribution of books. He says: By distributing books for free, the people do not encourage the books. So we should charge at least a small amount.


Appa Bhau Magdum secretly took part in freedom struggle. The large house of Bhau Babaji Magdum at Samdoli was a hiding place for many freedom fighters. In 1947, Appa Bhau Magdum took a long leave from his school and joined as the Secretary of Jain Students' Hostel at Sangli. At that time the hostel had became a meeting place of freedom fighters. He was fortunate enough to see the freedom, but in 1948 he died at the age of 40 years. This was a shock and setback not only for the entire Magdum family, but also for the Jain community of Southern Maharashtra.

Tuesday, March 25, 2008

आ. भा. मगदूम यांची कांही पुस्तके

आ. भा. मगदूम यांची कांही पुस्तके
कादंबरी
शिवाजी कोण? (छात्रपती शिवाजी महाराजांच्या जीवना वरील कादंबरी )
अहिंसेचा विजय
चरित्रे:
भगवान महावीर
सम्राट चन्द्रगुप्त
गुर्जर केसरी वनराज
भगवान पार्श्वनाथ
सम्राट खारवेल
चौदा रत्ने
नेमिसागर चरित्र
वीर प्रद्युम्न
राजा श्रेणिक
काव्य:
जैन वीर स्त्रिया
वीर पुष्पान्जली
नाटक
वीर चामुंडराय
कथा संग्रह
गरिबांचे जीवन
जैन वीर कथा
माहिती:
जैन धर्माची ओळख
वीर शासन
जैनांचे सण
संपादित:
नादलहरी (कवितासंग्रह)
प्रकाशन:
अहिंसा: बा. भू. पाटील
जैन आणि हिंदू: तातया केशव चोपडे
पंढरपूरचा विठोबा: तात्या केशव चोपडे
सामयिक पाठ: रा. ने. शहा
स्तुतीप्रभाव:
प्राचीन जैनाचार्य: प्रियंकर जैन

List of some of books by Veeranuyayi Aa. Bha. Magdum

Novels:
Shivaji Kon? (Novel on the great Maratha Warrior Chhatrapati Shivaji)
Ahinsecha Vijay (Novel on the philosophy of non-violence)

Biographies:
Bhagwan Mahavir
Samrat Chandragupt
Gurjar Kesari Vanraj
Bhagwan Parshwanath
Samrat Kharvel
Chouda Ratne (Fourteen Jewels, short biographies of 14 Jain Acharyas)
Jain Veer Striya ( Biographies of Jain women warriors)
Nemisagar Charitra
Veer Pradumna
Raja Shrenik

Poetry:
Jain Veer Striya
Veer Puspanjali

Drama
Chamundray

Collection of Stories:
Garibanche Jeevan (Life of Poors)
Jain Veer Katha (Stories of Jain Warriors)

Informative:
Jain Dharmachi Olakh (An introduction to Jainism)
Veer Shasan (About the philosophy of Bhagwan Mahavir)
Jainanche San (The festivals of Jains)

Edited:
Naadlahari: Collection of poems written by Marathi Jain poets

Published (Written by other writers)
Ahimsa by Ba. Bhu. Patil
Jain Ani Hindu by Tatya Keshav Chopade
Pandharpurcha Vithoba by Tatya Keshav Chopade
Samayik Path by R. N. Shah
Stutiprabhav (Collection of Poems)

Monday, March 24, 2008

अभिप्राय

तात्यासाहेब पांगळ अध्यक्ष जैन महाराष्ट्र साहित्य सभा

वीरानुयायी आ भा मगदूम यांची लेखनशैली सुबोध, सत्यत्वप्रीती उत्पन्न करणारी व अंत:करणाच्या तळमलीने ओथंबलेली असल्याने जैन समाजात जागृती झाल्याशिवाय रहाणार नाही.

सन्दर्भ: वीरशासन या पुस्तकावरील अभिप्राय १४.१२.१९३७


धर्मवीर रावजी सखाराम दोशी

आपले वीरशासन हे पुस्तक चांगले झाले आहे. पुस्तकाच्या शेवटी घातलेले वीर ध्वज वंदन हे पद येथे फारच आवडले असून आम्ही ते पाठशालेत सुरु केले आहे.


रा. ने. शहा

आ भा मगदूम यांच्या लिखाणातील भाषा अत्यन्त सोपी, शुद्ध व स्वच्छ असून त्यांच्या विवेचनात समतोलपणा दिसून येतो. सन्दर्भ: जैन धर्माची ओळख या पुस्तका वरील अभिप्राय १४.१२.१९३७


दे.भ. पोपटलाल शहा, पुणे

आजच्या कालात खरोखरीचे धर्मप्रभावनेचे साधन म्हणजे जैन धर्मीय साहित्य प्रकाशन हे होय. आपण हे महत्वाचे कार्य हाती घेऊन खरीखुरी सेवा बजावीत आहात असे वाटल्या वाचून रहात नाही. २२.११.१९४०


कवी गिरीश (प्राध्यापक कानेटकर)

वीरानुयायी यांनी भावनेचे उत्कृष्ट चित्र रंगविले आहे. विश्वासघात या कवितेच्या शेवटच्या ओलीतील रसोत्कर्ष फार रमणीय व उत्कट आहे. त्यांची ती कविता सरस असून तळमळ उत्पन्न करणारीही आहे. (प्रस्तावना, नादलहरी)

मनोहर बापूजी महाजन, अकोला

वीरानुयायी हे जैन महाराष्ट्राचे आवडते कवी व लेखक आहेत. त्यांची प्रतिभा काव्यातील तेजस्वी प्रसंगातून तरवारीच्या खणखणाटाप्रमाणे प्रसंग संपेपर्यंत एक सारखी झणत्कार काढीत जाते. (अभिप्राय, जैन वीर स्त्रिया)

Monday, March 17, 2008

शताब्दी समारोह समिती, सोलापूर

शताब्दी समारोह समिती, सोलापूर
1. डॉ. रावसाहेब पाटील, सोलापूर, अध्यक्ष
2. सौ. सुरेखा शहा, सदस्य
3. डॉ. कुलभूषण लोखंडे, सदस्य
4. प्राध्यापक सुमेरचंद जैन, सदस्य
5. डॉ. राजेन्द्र बीडकर, सदस्य
6. श्री. अरुण खोरे, सदस्य
7. ब्र. विद्युल्लता शहा, सदस्य
8. प्राध्यापक नरेश बदनोरे, सदस्य

Veeranuyayi Appa Bhau Magdum Birth Centenary 2006-2009
Celebration Committee, Solapur

  1. Dr. Ravsaheb Patil, President
  2. Mrs. Surekha Shah, Member
  3. Dr. Kulbhushan Lokhande, Member
  4. Professor Sumerchand Jain, Member
  5. Dr. Rajendra Beedkar, Member
  6. Shree Arun Khore, Member
  7. Br. Vidyulata Shaha, Member
  8. Professor Naresh Badnore

Friday, March 14, 2008

शताब्दी समारोह समिती, महाराष्ट्र

शताब्दी समारोह समिती, महाराष्ट्र

1. श्री. बालासाहेब कोगनोले, सांगली, अध्यक्ष
2. श्री. धनपाल हेरवाडे , सांगली, उपाध्यक्ष
3. श्री. मिलिंद फडे, पुणे, उपाध्यक्ष
4. श्री. श्रीधर हेरवाडे, कोल्हापूर, उपाध्यक्ष
5. डॉ. रावसाहेब पाटील, सोलापूर, सचिव
6. डॉ. अजित जनगोंडा पाटील, सांगली, सदस्य
7. प्राध्यापक रविन्द्र बलोळ, पुणे, सदस्य
8. सौ. सुनेत्रा नकाते, चिंचवड, पुणे. सदस्य
9. डॉ. दीपक तुपकर, , कणकवली (सिंधुदुर्ग), सदस्य
10. बाल. ब्र. विद्युल्लता शहा, सोलापूर, सदस्य
11. डॉ. राजेन्द्र बीडकर, सोलापूर. सदस्य
12. डॉ. दिलीप इंगोले, अकोला, सदस्य
13. श्री अशोक पाटील, सांगली, सदस्य
14. श्री. ने. सा. गुरूजी, समडोली, सदस्य
15. श्री. अरविंद मुखेडकर, मुम्बई, सदस्य
16. श्री महावीर सांगलीकर, पुणे, समन्वयक

Celebration Committee, Maharashtra
1. Shree Balasaheb Kognole, Sangli President
2. Shree Dhanpal Herwade, Sangli Vice President
3. Shree Milind Phade, Pune Vice President
4. Shree Shridhar Herwade, Kolhapur Vice President
5. Dr. Ravsaheb Patil, Solapur Secretary
6. Shree Suresh Adgonda Patil, Ex Mayor, Sangli Member
7. Dr. Ajit Jangonda Patil, Sangli Member
8. Professor Ravindra Ballol, Pune Member
9. Mrs. Sunetra Nakhate, Chinchwad Member
10. Bal. Br. Vidyulata Shaha, Solapur Member
11. Dr. Rajendra Beedkar, Solapur Member
12. Dr. Dipak Tupkar, Kanakvali (Sindhudurg) Member
13. Dr. Dilip Ingloe, Akola Member
14. Shree Ashok A. Patil, Sangli Member
15. shree Arvind Mukhedkar, Mumbai, member
16. Shree Mahavir Sanglikar, Pune Co-Ordinator

शताब्दी समारोह समिती, पुणे

शताब्दी समारोह समिती, पुणे
1. श्री मिलिंद फडे, अध्यक्ष
2. प्राध्यापक डॉ. सौ. नलिनी जोशी, सदस्य
3. प्राध्यापक डॉ. महावीर शास्त्री, सदस्य
4. प्राध्यापक रविन्द्र बलोळ, सदस्य
5. प्राध्यापक कमल कुमार जैन, सदस्य
6. श्री अजित पाटील, सदस्य
7. श्री. राजेन्द्र सुराणा, सदस्य
8. श्री. विद्याधर भूस, सदस्य
9. श्री. राजेन्द्र लांडे, सदस्य
10. श्री राजेन्द्र पाटील, सदस्य
11. श्री संजय चोरडिया, सदस्य
12. श्री संदीप सुरपुरिया, सदस्य
13. श्री नितिन जैन, सदस्य
14. श्री श्रीपाल ललवाणी, सदस्य
15. श्री अभय ललवाणी, सदस्य
16. श्री धिरज जैन, सदस्य
17. श्री जवाहर गुमते, सदस्य
18. श्री दिलीप खोबरे, सदस्य
19. प्राध्यापक अनिल गोरे, सदस्य
20. महावीर सांगलीकर, सदस्य

Veeranuyayi Appa Bhau Magdum Birth Centenary 2006-2009
Celebration Committee, Pune

1. Shree Milind Phade President
2. Professor Mrs. Nalini Joshi Member
3. Professor Mahavir Shastri Member
4. Professor Ravindra Ballol Member
5. Professor K.K. Jain Member
6. Shree Ajit Patil
7. Shree Rajendra Surana Member
8. Shree Vidyadhar Bhus Member
9. Shree Rajendra Lande Member
10. Shree Rajendra Patil Member
11. Shree Sanjay Chordiya Member
12. Shree Sandeep Surpuriya Member
13. Shree Nitin Jain Member
14. Shree Sripal Lalwani Member
15. Shree Abhay Lalwani Member
16. Shree Dhiraj jain Member
17. Shree Jawahar Gumate Member
18. Shree Dilip Khobare Member
19. Professor Anil Gore, Menber
20. Shree Mahavir Sanglikar Co-Ordinator

शताब्दी समारोह समिती, समडोली

वीरानुयायी आ. भा. मगदूम जन्म शताब्दी समारोह समिती, समडोली
1. श्री. नेमगोंडा सातगोंडा पाटील (ने. सा. गुरूजी ) अध्यक्ष
2. सरपंच, समडोली ग्राम पंचायत, सदस्य
3. मुख्याध्यापक, मराठी मुलांची शाला, समडोली, सदस्य
4. मुख्याध्यापक, मराठी मुलींची शाला, समडोली, सदस्य
5. मुख्याध्यापक, समडोली हायस्कूल, समडोली, सदस्य
6. मुख्याध्यापक, समडोली गर्ल्स हायस्कूल, समडोली, सदस्य
7. संघनायक, वीर सेवा दल, समडोली, सदस्य
8. राजेन्द्र पायगोंडा पाटील, समडोली, सदस्य
9. श्री. सुरेश जिनगोंडा पाटील, समडोली, सदस्य.
10. श्री सुरगोंडा रायगोंडा पयील, समडोली, सदस्य
11. श्री बाबासाहेब आन्ना पाटील, समडोली, सदस्य
12. श्री महावीर बाबू चव्हाण, माजी सरपंच, समडोली, सदस्य
13. श्री रविन्द्र अन्नासाहेब खोत, समडोली, सदस्य
14. श्री बालासाहेब भुजाप्पा खोत, समडोली, सदस्य
15. श्री जिनेश्वर श्रीमंधर कवठेकर, समडोली, सदस्य
16. प्राध्यापक आण्णासाहेब आदिशा भिलवडे, समडोली, सदस्य
17. सौ. कल्पना तात्यासाहेब पाटील, समडोली, सदस्य
18. श्री आदु धोंडी कांबले, समडोली, सदस्य
19. श्री दिनेश बालासाहेब ऐतवडे, (पत्रकार ), समडोली, सदस्य
20. श्री. संदीप बापुसाहेब ढोले, (पत्रकार ), समडोली, सदस्य
21. प्राध्यापक दिलीप आन्ना खोत, समडोली, सदस्य
22. प्राध्यापक भरतेश्वर भूपाल मगदूम, समडोली, सदस्य
23. श्री. कासिम अब्बास मुजावर, समडोली, सदस्य
24. श्री सविन्द्र पाटील, समडोली, सदस्य
25. श्री अनिल श्रीमंधर चव्हाण, समडोली, समन्वयक

Veeranuyayi Appa Bhau Magdum Birth Centenary 2006-2009
Celebration Committee, Samdoli


1. Shree Nemgonda Satgonda Patil (Ne. Sa. Guruji) President
2. Sarpanch, Samdoli Gram Panchayat Member
3. The Principal, Marathi Boy’s School, Samdoli Member
4. The Principal, Marathi Girl’s School, Samdoli Member
5. The Principal, Samdoli High School, Samdoli Member
6. The Principal, Girl’s High School, Samdoli Member
7. The Captain, Veer Seva Dal, Samdoli Member
8. Advocate Rajendra Paaygonda Patil, Samdoli Member
9. Shree Suresh Jingonda Patil, Samdoli Member
10. Shree Surgonda Raygonda Patil, Ex Sarpanch, Samdoli Member
11. Shree Babasaheb Anna Patil, Samdoli Member
12. Shree Mahaveer Babu Chavan, Ex Sarpanch, Samdoli Member
13. Shree Ravindra Annasaheb Khot, Samdoli Member
14. Shree Balasaheb Bhujappa Khot, Samdoli Member
15. Shree Jineshwar Shrimandhar Kavathekar, Samdoli Member
16. Professor Annasaheb Adisha Bhilwade, Samdoli Member
17. Mrs. Kalpana Tatyasaheb Patil, Samdoli Member
18. Shree Adu Dhondi Kambale, Samdoli Member
19. Shree Dinesh Balasaheb Aitwade (Jouranalist), Samdoli Member
20. Shree Sandeep Bapusaheb Dhole (Jouranalist), Samdoli Member
21. Professor Dilip Anna Khot, Samdoli Member
22. Professor Bharteshwar Bhupal Magdum, Samdoli Member
23. Shree Kasim Abbas Mujawar, Samdoli Member
24. Shree Savindra Pateel, Samdoli Member
25. Shree Anil Shrimandhar Chavan Co-Ordinator

Press Release1: Birth Centenary Celebrations of Kavi Veeranuyayi Start on the 18th March

The Birth Centenary Celebrations of noted Marathi writer, poet and publisher Aa. Bha. Magdum, also known as 'Kavi Veeranuyayi', will start on 18th March 2008.

Kavi Veeranuyayi was born on 26th March 1908 at Samdoli, a village near Sangli in Maharashtra. In a short life span of 40 years he wrote lot of articles, poems, lyrics and 19 books. He wrote in Marathi and also wrote in Hindi. His greatest achievement was to run a publishing house 'Shree Veer Granth Mala' from a village situated in remote area, that too in first half of the 20th century. This publishing house published 24 books of his own alongwith books of some other scholars.

His writing was appreciated by great scholars like Bramhachari Sital Prasadji and Ravaji Sakharam Doshi.

The birth centenary of Kavi Veeranuyai will be celebrated by the people of Samdoli, Dakshin Bharat Jain Sabha, Marathi Jain Sahitya Parishad, Maharashtra Jain Sanskritik Mandal, Arihant Jagruti Manch, Institute for Jain Studies and few other institutions throughout the year 2008-2009. The Birth Centenary Celebrations Committee has planned to republish some of Kavi Veeranuyayi’s books, seminars on his literature and writing competition for new writers. Some of his books will be translated in English.

The birth centenary celebrations will start in the holy presence of Jain Muni Tarunsagarji at 5 P.M. in Veeranuyayi Appa Bhau Magdum Nagar, Samdoli Highschool, Samdoli. Noted personalities from various parts of Maharashtra will be present at the ceremony.

You can reach Samdoli by City Bus from Sangli. Samdoli is just 8 Kilo Meters away from Sangli.

Centenary Ceremony on 22th September 2008

Centenary Inauguration Ceremony

Veeranuyayi Photographs

Veeranuyayi Handwriting