तात्यासाहेब पांगळ अध्यक्ष जैन महाराष्ट्र साहित्य सभा
वीरानुयायी आ भा मगदूम यांची लेखनशैली सुबोध, सत्यत्वप्रीती उत्पन्न करणारी व अंत:करणाच्या तळमलीने ओथंबलेली असल्याने जैन समाजात जागृती झाल्याशिवाय रहाणार नाही.
सन्दर्भ: वीरशासन या पुस्तकावरील अभिप्राय १४.१२.१९३७
धर्मवीर रावजी सखाराम दोशी
आपले वीरशासन हे पुस्तक चांगले झाले आहे. पुस्तकाच्या शेवटी घातलेले वीर ध्वज वंदन हे पद येथे फारच आवडले असून आम्ही ते पाठशालेत सुरु केले आहे.
रा. ने. शहा
आ भा मगदूम यांच्या लिखाणातील भाषा अत्यन्त सोपी, शुद्ध व स्वच्छ असून त्यांच्या विवेचनात समतोलपणा दिसून येतो. सन्दर्भ: जैन धर्माची ओळख या पुस्तका वरील अभिप्राय १४.१२.१९३७
दे.भ. पोपटलाल शहा, पुणे
आजच्या कालात खरोखरीचे धर्मप्रभावनेचे साधन म्हणजे जैन धर्मीय साहित्य प्रकाशन हे होय. आपण हे महत्वाचे कार्य हाती घेऊन खरीखुरी सेवा बजावीत आहात असे वाटल्या वाचून रहात नाही. २२.११.१९४०
कवी गिरीश (प्राध्यापक कानेटकर)
वीरानुयायी यांनी भावनेचे उत्कृष्ट चित्र रंगविले आहे. विश्वासघात या कवितेच्या शेवटच्या ओलीतील रसोत्कर्ष फार रमणीय व उत्कट आहे. त्यांची ती कविता सरस असून तळमळ उत्पन्न करणारीही आहे. (प्रस्तावना, नादलहरी)
मनोहर बापूजी महाजन, अकोला
वीरानुयायी हे जैन महाराष्ट्राचे आवडते कवी व लेखक आहेत. त्यांची प्रतिभा काव्यातील तेजस्वी प्रसंगातून तरवारीच्या खणखणाटाप्रमाणे प्रसंग संपेपर्यंत एक सारखी झणत्कार काढीत जाते. (अभिप्राय, जैन वीर स्त्रिया)
No comments:
Post a Comment