प्रख्यात जैन लेखक आ. भा. मगदूम उर्फ कवी वीरानुयायी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगली जिल्ह्यातील समडोळी या त्यांच्या गावी नुकताच भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री भालचन्द्र वग्याणी हे होते.
या प्रसंगी डॉ. चंद्रकांत चौगुले यांनी आ. भा. मगदूम यांच्या साहित्याचा विस्तृत परिचय करून दिला. आ. भां. च्या साहित्यातील विविधता त्यांनी उकलून दाखविली. आ. भा. मगदूम यांचे एक विद्यार्थी ने. सा. गुरूजी यांनी आ. भां. च्या आठवनींना उजाळा दिला. त्या नंतर मगदूम कुटुम्बातर्फे श्री अनिल चव्हाण यांनी आ. भां. चे आप्तस्वकीय व वंशज यांच्या विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमात आ. भा. मगदूम यांच्या 'भारतीय जैन सम्राट' या पुस्तकाचे पुन: प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment